पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला..?

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला..?

पंजाबराव डख यांनी आज, 8 सप्टेंबर 2025 रोजी राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले असले, तरी पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन सूर्यदर्शन होत राहील, तसेच दुसरीकडे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसणार असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे.

🔴राज्यात सूर्यदर्शन झाले, पण पाऊस कायम असणार..?

पंजाबराव डख यांनी यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 8 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे, ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब असून. मात्र, हे सूर्यदर्शन सर्वत्र पावसाची उघडीप देणारे नाही. आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी गाफील राहू नये, असा सल्ला त्यांनी दिलाय.

राज्यात आज सूर्यदर्शन झाले असले तरी, पुढील दोन दिवस म्हणजेच 8 आणि 9 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चाळीसगाव, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस सुरूच राहील. त्यानंतर मात्र या भागांमध्ये 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान चांगल्या सूर्यदर्शनाची अपेक्षा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळेल.

मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसणार
राज्याच्या एका भागात पावसाची उघडीप असली तरी, दुसऱ्या भागात मात्र परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार असं डख यांच्या अंदाजानुसार आहे. 11,12 आणि 13 सप्टेंबर या तारखांमध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल.

प्रभावित जिल्हे: लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी आणि यवतमाळ.
या जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment