परतीचा पाऊस कधी पासून सुरु होणार माणिकराव खुळे म्हणतात.

परतीचा पाऊस कधी पासून सुरु होणार माणिकराव खुळे म्हणतात.

हवामान विभागाचे प्रमुख हवामान तज्ञ तसेच अचूक हवामान अंदाज सांगणारे माणिकराव खुळे यांनी दि.07/सप्टेंबर/2025 रोजी पुढील पाच दिवसांचा अंदाज दिला आहे. माणिकराव खुळे म्हणतात की, आजपासुन म्हणजेच दि. (07/सप्टेंबर) पासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप असून, शेतकरी मित्रांनो काय म्हणतात माणिकराव खुळे पाहुया कोणत्या भागात पावसाची उघडीप आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, खालील प्रमाणे पाहूया..?

आज 08/ सप्टेंबर पासुन संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अ.नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर, जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. 11/सप्टेंबर पर्यंत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडीप दि. 09/सप्टेंबर पासुन असेल असे माणिकराव खुळे स्पष्ट केलं आहे.

🔴या तारखेपासून पुन्हा पाऊस – माणिकराव खुळे..?

मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ,आणि खान्देश व नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर अश्या 21,जिल्ह्यांत शुक्रवार दि.12/ सप्टेंबरपासुन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तसेच मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील 15 जिल्ह्यात मात्र ह्या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. असं ही माणिकराव खुळे यांनी दिली आहे..

Leave a Comment